आपला जिल्हाताज्या घडामोडी

प्रजासत्ताक दिनी गडचिरोलीसाठी ; 193 युवक रोजगारासाठी सज्ज

गडचिरोली, प्रतिनिधी :

लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) अंतर्गत 77व्या प्रजासत्ताक दिनी पहिल्या तुकडीतील 193 प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. 45 दिवसांचा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करून हे युवक रोजगारासाठी सज्ज झाले आहेत.

या प्रसंगी बोलताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी. प्रभाकरन यांनी युवकांचे अभिनंदन करत गडचिरोलीला “भारताचे दुसरे जमशेदपूर” बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. LMGSE मधील प्रशिक्षण युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित जिल्हाधिकारी श्री अविश्यंत पांडा यांनी गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ₹3 लाख कोटींची गुंतवणूक होत असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे सांगितले. युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणारे उपक्रम जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

11 डिसेंबरपासून सुरू झालेल्या LMGSE उपक्रमामुळे गडचिरोलीतील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker