कोरोना

आज एका मृत्यूसह गडचिरोली जिल्ह्यात 01 कोरोनाबाधित

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

आज एका मृत्यूसह गडचिरोली जिल्ह्यात 01 कोरोनाबाधित तर  02 कोरोनामुक्त  झाले आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 780 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एका मृत्यूमध्ये तालुका कोरची जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 आज गडचिरोली जिल्हयात 174 कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधित 01 तर कोरोनामुक्ताची  संख्या 02 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38314 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37530 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 04 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 780 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

 एका मृत्यूमध्ये तालुका कोरची जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.95 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.04 टक्के झाला आहे. कोरोनाबाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01 जणाचा समावेश असून कोरोनामुक्तामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01 व चामोर्शी तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker