आपला जिल्हाताजा खबर

वीज ग्राहकांच्या हक्कांसाठी २ नोव्हेंबरला आलापल्लीत विराट मोर्चा

आलापल्ली, प्रतिनिधी :-

वीज ग्राहकांच्या विविध समस्या, अन्याय आणि हक्कांच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी आलापल्ली येथे महावितरण कंपनीच्या कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विद्यार्थी एकता मंचच्या वतीने युवा नेते तथा अहेरी विधानसभा क्षेत्रातील कैलासभाऊ कोरेत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

वीज ग्राहकांच्या हक्कांसाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा उभारण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ‘वीज ग्राहकांचे हक्क, आमचा लढा… न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच!’ या घोषवाक्याखाली आयोजित या मोर्चातून वीज ग्राहकांच्या प्रश्नांकडे शासन आणि महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

सोमवारी दुपारी १२.१२ वाजता वनविभाग पटांगण येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके चौक मार्गे महावितरण कंपनीच्या आलापल्ली येथील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे.

वीज ग्राहकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात परिसरातील नागरिक, वीज ग्राहक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक कैलासभाऊ कोरेत यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker