ताज्या घडामोडी
काँग्रेसचे अहेरीत बंडखोरांना अभय

उदय धकाते
गडचिरोली :-
विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षात प्रचंड बंडखोरी झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेते हतबल झाले असतांना अहेरी मधील बंडखोर उमेदवारावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने महाविकास आघाडी मध्ये धुसपूस सुरु झाली आहे.काँग्रेसचे अहेरीत बंडखोरांना अभय दिल्याची चर्चा सुरुआहे.
अहेरी मतदार संघात चूरशीची निवडणूक होत आहे. येथे काँग्रेस पक्षात प्रचंड बंडखोरी झाली आहे. काँग्रेस चे माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांच्या कन्या कन्या जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा यांनी पक्षाने उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करीत आपला उमेदवारी कायम ठेवत त्यांनी प्रहार पक्षा कडून निवडणूक लढत आहेत. नीता तलांडी यांच्यावर काँग्रेस पक्षाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

काँग्रेस पक्षाचे हनुमंतू मडावी हे जिल्हा आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत. यांनी मागील महिण्यात अहेरी मतदार संघात काँग्रेस पक्षाचा मोठा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते. या मेळाव्यात काँग्रेस नेते अंजय कंकडलवार सह अहेरी मतदार संघातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी विजय वडेट्टीवार यांनी हनुमंतू मडावी हे काँग्रेस चे अधिकृत उमेदवार आणि आमदार असतील असे भाषणात सूचित केले होते. परंतु अहेरी येथील जागा महाविकास आघाडी तील राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्याने काँग्रेस च्या आशेवर पाणी फिरले. या ठिकाणी काँग्रेस चे नीता पेंटा तलांडी आणि हनुमंतू मडावी या जिल्हा पदाधिकारीनी पक्षात बंडखोरी करीत विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडी मध्ये फूट पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार गटाचे भाग्यश्री धर्मराव आत्राम या आपल्या वडिलांविरोधात निवडणूक लढवीत आहेत.
काँग्रेस पक्षाने अद्याप हनुमंतू मडावी यांच्यावर कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. मडावी यांना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे आशीर्वाद आहे काय असा प्रश्न महाविकास आघाडी मध्ये विचारला जात असून शरद पवार यांनाच अहेरीतून शह देण्याचा हा प्रयत्न करीत असल्याचा दावा आघाडी तर्फे केल्या जात आहे.
हनुमंतू मडावी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतांनाकाँग्रेस पक्षाच्या झेंड्यासह मोठी रॅली काढली होती. या वेळी मोठं शक्तीप्रदर्शन काँग्रेस पक्षाने केले होते.यावेळी वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक पूढे होते हे विशेष.




छान बातमी