ताज्या घडामोडीदेश विदेश

दक्षिण गडचिरोलीत पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या सिरोंचा व अहेरी तालुक्यांना बुधवारी (ता.२५) मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री सुमारे ११.५० वाजता अहेरी, आलापल्ली, नागेपल्लीसह परिसरातील अनेक गावांमध्ये जमिनीला हलके कंप जाणवल्याने नागरिक काही काळ भयभीत झाले.

National Center for Seismology ने या भूकंपाची अधिकृत नोंद केली असून तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणातील Mancherial जिल्ह्यातील Ramagundam पासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले.

गोदावरी नदी खोऱ्यातील सिरोंचा व अहेरी तालुके तेलंगणातील Medigadda Barrage परिसराच्या प्रभावक्षेत्रात येतात. तसेच या भागालगत लोहखनिज व कोळसा खाणींची उपस्थिती असल्याने अलीकडच्या काळात वारंवार सौम्य धक्के जाणवत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

मागील पाच वर्षांचा भूकंपाचा इतिहास :-

गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सिरोंचा, अहेरी, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.

२९ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्यरात्री ३.८ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला.

४ डिसेंबर २०२४ रोजी ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे धक्के गडचिरोलीसह चंद्रपूर आणि छत्तीसगड राज्यातही जाणवले. त्या वेळी केंद्रबिंदू तेलंगणातील मुलुगु (Mulugu) येथे होता.

ताज्या घटनेनंतर दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले असले तरी कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker