आपला जिल्हाताज्या घडामोडी
वंचितचा गडचिरोली नगर परिषदेत बोगस शिक्षक भरतीचा आरोप
चौकशी करून भरती रद्द करण्याची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली नगर परिषदेतील कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते नगरसेवक तथा शिक्षण समितीचे सदस्य बाळू टेंभुर्णे यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी संगनमत करून नियमांना डावलत बोगस पद्धतीने शिक्षक भरती केल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांच्याकडे तक्रार दाखल करून संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते टेंभुर्णे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गडचिरोली नगर परिषदेने विविध विभागांसाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी मे. यशश्री एंटरप्रायझेस, सोलापूर या संस्थेशी २८ एप्रिल २०२६ रोजी ई-निविदेद्वारे करार केला होता. त्यानुसार नगर परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचा ठराव ३० जून २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.



