आपला जिल्हाताज्या घडामोडी

रामपुरी वार्डात सामुदायिक तुळशी विवाह उत्साहात संपन्न

सामाजिक एकोपा आणि मनोमिलनाचा दिला संदेश

गडचिरोली, प्रतिनिधी :-

‘सामुदायिकता वाढे सर्वत्र, हेच सणवाराचे मुख्य सूत्र’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना अनुसरून गडचिरोली येथील रामपुरी वार्ड, चामोर्शी रोड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वार्डातील नागरिकांनी आपापल्या तुळशी वृंदावन एकत्र आणून विधिवत पूजन केले. धार्मिक परंपरेनुसार भगवान विष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला निद्रेतून जागे होतात. भगवान विष्णूच्या जागृतीचा उत्सव म्हणून तुळशी विवाह साजरा केला जातो.

सामुदायिक तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकोपा, परस्पर सामंजस्य आणि समाज जोडण्याचे प्रतीक आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आपुलकीची भावना वाढीस लागून सण-उत्सव सामूहिकरीत्या साजरे करण्याची परंपरा अधिक दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले.

या कार्यक्रमाला प्रविण मुक्तावरम, मनोज कवठे, उल्हास बाटवे, दिनेश बावीस्कर, मंजिरी बाटवे, प्रिती मुक्तावरम, स्वाती कवठे, आशा बावीस्कर, अर्चना पेशट्टीवार, अथर्व कवठे, सौम्या बाटवे, प्रांजली मुक्तावरम यांच्यासह वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पोपाहार देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्याची सांगता झाली.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker