आपला जिल्हाताज्या घडामोडीशिक्षण

आलापल्ली आयटीआयमध्ये कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

आलापल्ली, प्रतिनिधी :-

राजे विश्वेश्वरराव आत्राम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), आलापल्ली येथे २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. संस्थेचे प्राचार्य व्ही. एम. बोनगीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५० प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन श्रीगिरीवार होते, तर प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून राजे धर्मराव आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागेपल्ली येथील प्राध्यापक सूर सर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दोरीवार सर यांनी प्रास्ताविकातून कौशल्य दीक्षांत समारंभाचे महत्त्व विशद करून संस्थेच्या कामगिरीचा आढावा सादर केला. प्रमुख वक्ते प्रा. सूर सर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व, औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात नितीन श्रीगिरीवार यांनी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुमारे ५० प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. येरावार मॅडम यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व निदेशक आणि कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker