क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत स्नेहम खरबडे हिला रौप्यपदक

नागपूर, प्रतिनिधी :-
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत आयोजित D.S.O. राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२६-२७ मध्ये सेंट व्हिन्सेंट पॅलोटी स्कूलची विद्यार्थिनी स्नेहम हेमंत खरबडे हिने रौप्यपदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
शाळेच्या इयत्ता सहावी ‘अ’ मध्ये शिकणाऱ्या स्नेहमने १४ वर्षांखालील मुलींच्या कुमिते प्रकारातील २२ किलोखालील वजनगटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यापूर्वी नागपूर विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून तिने राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान निश्चित केले होते. राज्यस्तरावरही सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने रौप्यपदकाची कमाई केली.




