ताज्या घडामोडी

किसाननगरच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणार – डॉ. अशोक नेते

गुरुनानक शाही गुरुद्वारा सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

गडचिरोली, प्रतिनिधी :-

श्री गुरुनानक शाही गुरुद्वारा सेवा समिती, किसाननगर (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथील पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी किसाननगर परिसरातील विविध स्थानिक समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि विकासविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील समस्या डॉ. नेते यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी त्यांनी सर्वांचे म्हणणे आस्थेने ऐकून घेत, “मी आपल्या सोबत आहे. आपल्या भागातील समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी निश्चितच आवश्यक ते सहकार्य करेन,” असे आश्वासन दिले.

दरम्यान, श्री गुरुनानक जयंतीच्या पावन पर्वानिमित्त किसाननगर येथे येऊन श्री गुरुनानक शाही गुरुद्वाराला भेट द्यावी आणि दर्शन घ्यावे, असे निमंत्रण समितीच्या वतीने डॉ. नेते यांना देण्यात आले. या निमंत्रणाचा स्वीकार करत त्यांनी गुरुनानक यांच्या आशीर्वादासाठी निश्चितच किसाननगर येथे येऊन गुरुद्वाराला भेट देण्याचे आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान सामाजिक सलोखा, धार्मिक परंपरा आणि स्थानिक विकासाच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी पम्मी सलोजा यांच्यासह गुरुद्वारा सेवा समितीचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी आणि कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker