आपला जिल्हानिवडणूक
गडचिरोली – भाजपची ‘वाट’ बिकट

उदय धकाते
गडचिरोली :-
गडचिरोली विधानसभा मतदार क्षेत्रात महायुतीचे भाजप उमेदवारची ‘वाट’ बिकट बनली आहे. सदर उमेदवार ची वाट कोणती आहे या बाबत पक्षात चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक भाजप आजी – माजी पदाधिकारी यांना अजूनही उमेदवारने वाट दाखवली नसल्याने भाजपचीच वाट आता बिकट ठरली आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांचे पत्ता साफ करून नवखा उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. परंतु यांच्या सोबत असलेले अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जिल्ह्यात भाजप पक्षाची बांधणी केलेल्या माजी सक्रिय पदाधिकारी यांना बाजूला करून त्यांची वाट भविष्यात कोणती राहणार असे सूचित केल्याने या भाजप नेत्यांना व कार्यकर्ते यांच आता भाजपात कोणताच महत्व उरले नसल्याची भावना झाली आहे.
भाजपात नवखे पदाधिकारी यांना निवडणुकीची कोणत्याही रणनीतीची माहिती नसलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सोबत घेऊन उमेदवार प्रचाराची धुरा घेऊन प्रचार करीत आहेत.या मुळे भाजपची ‘वाट’ बिकट ठरली आहे.
कोणतताही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी यांनी उमेदवार ला सूचना किंवा सल्ला देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आपण ‘वाट’ काढू असं सांगितले जात असल्याने आता भाजपचीच गडचिरोली मतदार संघात ‘वाट’ लागेल यांची चिंता भाजप पक्षासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लागली आहे.या पेक्षा आमदार डॉ. देवराव होळी यांची निवडणुकीत योग्य ‘वाट’ असायची असे भाजप मध्ये चर्चा आहे.



