गडचिरोली, प्रतिनिधी :-
“दुर्गम भागातील गडचिरोली जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत. त्यांना योग्य सुविधा आणि उत्कृष्ट शिक्षक मिळाले तर ते नक्कीच मोठी झेप घेतील,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव Rajesh Agarwal यांनी केले.
Zilla Parishad Gadchiroli च्या ‘मिशन जिंकूया’ या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या २० विद्यार्थ्यांना मुंबई येथे ऐतिहासिक व शैक्षणिक सहलीसाठी विमानाने नेण्यात आले. विद्यार्थ्यांनी मुख्य सचिवांच्या निवासस्थानी भेट देत संवाद साधला. “इतनी शक्ति हमें देना दाता” हे प्रार्थना गीत सादर करत त्यांनी आपल्या आत्मविश्वासाची छाप पाडली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन, ओएमआर सराव, परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा आणि शिक्षकांसाठी विशेष उंबोधन वर्ग राबविण्यात येतात. हा उपक्रम जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून सुरू आहे.
मुंबई दौऱ्यात विद्यार्थ्यांनी Mantralaya, Gateway of India, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Elephanta Caves, Nehru Science Centre आणि Nehru Planetarium यांसारख्या स्थळांना भेट दिली.
पुढील वर्षी या उपक्रमांतर्गत १०० विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ‘आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना हैदराबाद व बेंगळुरू येथील संशोधन केंद्रांना भेट देण्याची योजना आहे.
या उपक्रमामुळे गडचिरोलीतील ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत नवी उमेद निर्माण झाली असून स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
Back to top button