आपला जिल्हाताज्या घडामोडी
आदिवासींच्या अस्मितेशी खेळ करणाऱ्यांना आदिवासी समाज धडा शिकवेल – ॲड. विश्वजीत कोवासे

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जनजाती सांस्कृतिक समागम कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया देताना देशातील आदिवासी समाजाची ओळख, इतिहास आणि अस्मिता नाकारण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून सातत्याने केला जात असल्याचा आरोप केला.
रामलीला मैदानावर आयोजित कार्यक्रमात देशभरातील आदिवासी बांधवांना “डिलिस्टिंग”च्या नावाखाली दिशाभूल करून बोलावण्यात आले आणि त्यांना “वनवासी” म्हणून संबोधण्यात आले. “वनवासी” हा शब्द आदिवासी समाजाच्या मूळ अस्तित्वाला नाकारणारा असून, तो संपूर्ण आदिवासी समाजासाठी अपमानास्पद असल्याची भावना समाजात असल्याचे काँग्रेस कमिटीने म्हटले आहे.
विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी पुढे सांगितले की, आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी असून त्यांची स्वतंत्र संस्कृती, परंपरा आणि ओळख आहे. त्यामुळे आदिवासींना “वनवासी” म्हणणे म्हणजे त्यांच्या इतिहासालाच नाकारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
आदिवासी समाज आपल्या स्वाभिमानाबाबत अत्यंत जागरूक असून त्यांच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्यांना येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने योग्य उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला असून अमित शहा यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक नंदू कायरकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सचिव नंदू वाईलकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसच्या सचिव कुसुम अलाम, माधुरीताई मडावी, माजी नगरसेवक विजय गोरडवार, माजी नगरसेवक संजय मेश्राम, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल भाई पंजेवाणी, माजी नगरसेवक रवींद्र किरमिरवार, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विवेक घोंगडे, अभिजीत घाईत, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, जितू मुनघाटे, श्रीनिवास आंबटवार, अविनाश साळवे, मिलिंद बागेसार, शालिनी पेंदाम, रीता गोवर्धन, कविता उराडे, माजी नगरसेविका मीनलताई चिमूरकर, शितलताई ठवरे, उमाजी बारसागडे, तुळशीदास भोयर, सरपंच संजय गावडे, जितेंद्र मुप्पीडवार, युवराज जुवारे, योगेश नैताम, नंदू सोमणकर, चारुदत्त पोहाणे, अतुल राचमलवार, सोनू अलाम, सचिन सोमनकर, नंदू सोमनकर, अभिषेक चौधरी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



