गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली येथील सौ. रेखाबाई प्रभाकरराव बारापात्रे (वय ७२), रा. शिक्षक कॉलनी, चनकाईनगर, गडचिरोली यांचे गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्यूपूर्वी त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना गडचिरोली येथे आणण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पती प्रभाकरराव बारापात्रे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते), मुलगी प्रतिभा प्रभाकर बारापात्रे-नंदनवार (शिक्षिका), मुलगा, जावई तसेच नातवंडे आणि आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता गडचिरोली येथील कठाणी नदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सौ. रेखाबाई बारापात्रे यांच्या निधनाबद्दल सामाजिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button