ताज्या घडामोडीसामाजीक

गुरुनानक जयंतीनिमित्त किसान नगर गुरुद्वारात डॉ. अशोक नेते यांचे दर्शन

गुरुद्वारा बांधकामासाठी सहकार्याचे आश्वासन

सावली, प्रतिनिधी :-

शीख धर्माचे संस्थापक आणि मानवतेचा संदेश देणारे श्री गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त सावली तालुक्यातील किसान नगर येथील श्री गुरु नानक शाही गुरुद्वारात गुरुपर्व उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गुरुद्वारात जाऊन श्री गुरु नानक देवजी यांचे दर्शन घेतले. तसेच शीख बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक

श्री गुरु नानक शाही गुरुद्वारा सेवा समिती, किसान नगर यांच्या वतीने जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला डॉ. अशोक नेते यांनी भेट देत रक्तदात्यांचे अभिनंदन केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदात्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरात त्यावेळी २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. रक्तदानाची प्रक्रिया पुढेही सुरू होती. सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

गुरुद्वारा बांधकामासाठी सहकार्याचे आश्वासन

यावेळी गुरुद्वारा परिसरातील आवश्यक बांधकामाबाबत सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. नेते यांच्याशी चर्चा केली. गुरुद्वाराच्या बांधकामासाठी आवश्यक ते प्रयत्न करून शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी पामी सलोजा, संजय मजोके, योगेश गलगट, शैलेश मजोके, प्रदीप सुरे, मुकेश बिके यांच्यासह शीख समाजातील बांधव, भगिनी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी गुरुद्वारा सेवा समितीच्या वतीने डॉ. अशोक नेते यांचा सन्मान करण्यात आला. धार्मिक श्रद्धेसोबतच मानवसेवा, सामाजिक एकोपा आणि रक्तदानाचा संदेश देणारा हा गुरुपर्व सोहळा उत्साहात पार पडला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker