ताज्या घडामोडीसामाजीक

श्री गुरु नानक देव गडचिरोली शहरातील गुरुद्वारात माजी खासदार नेते यांनी घेतले दर्शन

गडचिरोली,प्रतिनिधी : –

शीख धर्माचे संस्थापक, महान संत व मानवतेचा संदेश देणारे श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली शहरातील गोकुळ नगर परिसरातील लंगर साहेब गुरुद्वारात भक्तिमय वातावरणात गुरुपर्व साजरा करण्यात आला.

यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गुरुद्वाराला भेट देऊन श्री गुरु नानक देव जी यांचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. ‘बोले सो निहाल,’च्या जयघोषात त्यांनी उपस्थित शीख बांधव, गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी व भाविकांना गुरु नानक देव जी जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी डॉ. अशोकजी नेते यांनी गुरु नानक देव जी यांच्या विचारांचे स्मरण करत मानवता, समानता, बंधुभाव, सेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश आजच्या समाजासाठीही तितकाच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सर्वधर्मीयांनी परस्पर आदर, प्रेम आणि एकोपा जपत समाजाच्या कल्याणासाठी कार्य करावे, हीच गुरु नानक देव जी यांच्या शिकवणीची खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी गुरुद्वारा समितीच्या वतीने डॉ. अशोकजी नेते यांचा शाल पिवळा दुपट्टा देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मंगलसिंग पटवा, सुनीलसिंग पटवा, राजेंद्रसिंग प्रधानी, गुरुमानसिंग, गुरुदेवसिंग प्रधानी यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी, शीख बांधव, भगिनी व भाविक उपस्थित होते.

गुरुपर्वाच्या निमित्ताने गोकुळ नगर परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. श्रद्धा, सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker