आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

दिल्लीतील भाजपच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ. अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती

नवी दिल्ली, प्रतिनिधी :-

भारतीय जनता पार्टीच्या वतीने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील भाजपा केंद्रीय कार्यालय विस्तार येथे आयोजित ‘जनजातीय चिंतन बैठकी’त माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीच्या निमित्ताने भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आगमन झाल्यानंतर डॉ. अशोकजी नेते यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

या बैठकीला भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, सर्वानंद सोनोवाल, जुएल ओराम, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार डॉ. मन्नालाल रावत, राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश, राष्ट्रीय महामंत्री गजेंद्र पटेल तसेच महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या चिंतन बैठकीत जनजातीय समाजाचा सर्वांगीण विकास, समाजासमोरील विविध प्रश्न, संघटनात्मक बळकटीकरण आणि आदिवासी समाजाच्या हितासाठी राबविण्यात येणारे उपक्रम या विषयांवर सविस्तर चर्चा व विचारमंथन करण्यात आले.

या बैठकीतील डॉ. अशोकजी नेते यांचा सहभाग त्यांच्या राष्ट्रीय संघटनात्मक जबाबदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. जनजातीय समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देशभरातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी या बैठकीच्या माध्यमातून एकत्र आले होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker