देसाईगंज (वडसा), प्रतिनिधी :-
आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याचा आणि भूमिकेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने देसाईगंज येथे जाहीर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर करणार आहेत. देसाईगंज येथील फवारा चौकात दुपारी ४ वाजता हे आंदोलन होणार असून, पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे आवाहन जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ नाकाडे, प्रदेश सचिव युनुस भाई शेख, कार्याध्यक्ष नंदूभाऊ नरोटे, विधानसभा अध्यक्ष किशोरभाऊ तलमले आणि तालुकाध्यक्ष पिंकूभाऊ बावणे यांनी केले आहे.
“आपली उपस्थिती हीच आपली एकजूट!” या संदेशातून पक्षाने कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Back to top button