क्राईमताज्या घडामोडीशासन निर्णय

आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्याच्या निर्णयात सुधारणा

नुकसान मर्यादा ५ लाखांवरून साडेसात लाखांपर्यंत

गडचिरोली, प्रतिनिधी :-

राजकीय व सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेल्या प्रलंबित खटले मागे घेण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गृह विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, आंदोलनादरम्यान खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास खटले मागे घेण्यासाठी असलेली नुकसानभरपाईची मर्यादा ५ लाख रुपयांवरून वाढवून ७ लाख ५० हजार रुपये करण्यात आली आहे.

यापूर्वी २० सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार, राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यासाठी संबंधित घटनेत खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ५ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे, अशी अट होती. मात्र, बांधकाम साहित्याच्या किमती, देखभाल खर्च आणि महागाई निर्देशांकातील वाढ लक्षात घेता ही मर्यादा वाढविण्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आली होती.

या पार्श्वभूमीवर शासनाने गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने नुकसान मर्यादा ५ लाखांवरून ७.५० लाख रुपये करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार गृह विभागाने संबंधित अटीत अंशतः सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे सार्वजनिक हिताच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करणारे विद्यार्थी, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच न्यायालयांवरील प्रलंबित खटल्यांचा भार कमी होण्यास आणि पोलीस यंत्रणेचा वेळ गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी वापरण्यास मदत होणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, खटले मागे घेण्यासंदर्भातील २० सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयातील इतर अटी, शर्ती व तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ मालमत्तेच्या नुकसानीची आर्थिक मर्यादा वाढविण्यात आली असून, इतर निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

वाचा शासन निर्णय –

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker