आपला जिल्हाताज्या घडामोडी

गुरुनानक जयंतीनिमित्त गोकुळ नगर गुरुद्वारात नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे दर्शन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

श्री गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त येथील गोकुळ नगर परिसरातील श्री गुरुनानक गुरुद्वारा कमिटीला नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, नगरसेवक सागर अरुण निंबोरकर आणि उपाध्यक्ष निखिल भाऊ चरडे यांनी भेट दिली. यावेळी मान्यवरांनी गुरुद्वारात दर्शन घेऊन शीख बांधवांना गुरुनानक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नगराध्यक्षांनी गुरुद्वारा कमिटीचे पदाधिकारी आणि उपस्थित शीख बांधवांशी संवाद साधला. गोकुळ नगर परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या शीख बांधवांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर राहणार असून, गुरुद्वाराच्या विकासासाठी वैयक्तिक स्तरावर तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी दिले.

श्री गुरु नानक देवजी यांनी मानवता, समानता, बंधुभाव, सेवा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचे आचरण करून समाजात एकता आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी नगरसेवक सागर निंबोरकर, मंगलसिंग पटवा, सुनीलसिंग पटवा, राजेंद्रसिंग प्रधानी, गुरुमानसिंग, गुरुदेवसिंग प्रधानी यांच्यासह गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी, शीख बांधव, भगिनी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींच्या या सदिच्छा भेटीबद्दल गुरुद्वारा कमिटीच्या वतीने स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले. भक्तिमय वातावरणात गुरुपर्व उत्साहात साजरा करण्यात आला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker