आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोलीतील शाळा सकाळच्या पाळीत भरविण्याचे आदेश

SIR मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती

गडचिरोली, प्रतिनिधी :-

भारत निवडणूक आयोगाच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळा सकाळच्या पाळीत भरविण्याचे निर्देश दिले आहेत.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक)वासुदेव भुसे यांनी ६ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेमुळे अनेक शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशानुसार, ज्या शाळांमधील शिक्षकांची SIR/BLO कामासाठी नियुक्ती झाली आहे, त्या शाळांनी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत शाळा भरवाव्यात. तसेच सकाळ व दुपार अशा दोन पाळ्यांमध्ये चालणाऱ्या शाळांमध्ये ज्या शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती झाली आहे, त्या शाळांनी संबंधित शिक्षकांच्या उपलब्धतेनुसार सकाळच्या पाळीत अध्यापनाची व्यवस्था करावी.

हे आदेश बुधवार, दि. ८ जुलै २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी शिक्षकांची जबाबदारी पार पाडतानाच विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षणही अबाधित राहावे, हा प्रशासनाचा उद्देश असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker