आपला जिल्हाताज्या घडामोडी
रिमझिम पावसाने गडचिरोलीकरांना दिलासा; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या तत्परतेने वाहतूक सुरळीत

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहर व परिसरात काल रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान झालेल्या रिमझिम पावसामुळे नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना या पावसाने गारव्याची सुखद अनुभूती दिली.

काल सायंकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह वादळी वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानंतर रात्री पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. मात्र वादळी वाऱ्यांमुळे गडचिरोली-आरमोरी मार्गावरील अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
दरम्यान, आज सकाळी सुमारे ७ वाजता आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पडलेल्या झाडांची पाहणी केली. त्यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ सूचना देत रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले.



