ताज्या घडामोडीसामाजीक

पत्रकार अजय बिवडे यांना ‘अजेय लेखणी सन्मान-२०२६’ पुरस्काराने गौरव

मुंबईत भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान; पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल

नागपूर, प्रतिनिधी :-

नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सिंहवाणी वृत्तचे मुख्य संपादक अजय बिवडे यांना पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘अजेय लेखणी सन्मान-२०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील दादरमधील सुरेंद्र गावसकर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे आर्यारवी एन्टरटेन्मेंटच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या अजय बिवडे यांनी विविध दैनिके आणि वृत्तपत्रांमधून निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि समाजाभिमुख पत्रकारितेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ते भारत सरकारमान्य पीआरजीआय प्रेस असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, दैनिक शिवघोषचे संपादक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ कवी व गझलकार अरुण म्हात्रे, विसूभाऊ बापट, श्रीधर कीर, वैभव कदम, सुनील शिर्के यांच्यासह साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आर्यारवी एन्टरटेन्मेंटचे अध्यक्ष महेश्वर तेटांबे आणि समन्वयक गुरूनाथ तिरपणकर यांनी अजय बिवडे यांच्या पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या भावी पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या.

अजेय लेखणी सन्मान-२०२६‘ पुरस्कारामुळे अजय बिवडे यांच्या पत्रकारितेतील योगदानाला नवी दखल मिळाली असून, नागपूरसह राज्यातील पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker