नवी दिल्ली, प्रतिनिधी : –
कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीतील सत्र न्यायालयाने माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक Arvind Kejriwal तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री Manish Sisodia यांना आरोपमुक्त केले आहे. न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाच्या आरोपपत्राची दखल घेण्यासही नकार दिला.
विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंग यांनी आदेश देताना आरोपपत्रात अनेक त्रुटी असल्याचे नमूद केले. आरोपपत्रातील दावे पुराव्यांनी समर्थित नसल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. तसेच या प्रकरणात दोन्ही नेत्यांव्यतिरिक्त इतर २१ जणांना यापूर्वीच दिलासा मिळाल्याने आरोपपत्रातील कमतरता स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले.
निकालानंतर आपण सुरुवातीपासूनच निर्दोष असल्याचे सांगत आलो असून अखेर सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली.
दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने स्पष्ट केले. तपासातील अनेक मुद्द्यांचा पुरेसा विचार झालेला नाही, त्यामुळे अपील करणे आवश्यक असल्याचे विभागाने नमूद केले.
Back to top button