ताज्या घडामोडीमनोरंजन

“ऐतिहासिक वारसा संवर्धन हे नैतिक कर्तव्य” – प्रा. प्रदीप बोडणे

गोंडवानाचे विद्यार्थिची वैरागड किल्लास भेट

गडचिरोली, प्रतिनिधी : –

गोंडवाना विद्यापीठच्या पदव्युत्तर इंग्रजी विभाग आणि आदिवासी अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वैरागड : गोंडकालीन ऐतिहासिक वारसा’ या उपक्रमांतर्गत वैरागड किल्ल्यावर एकदिवसीय शैक्षणिक अभ्यास भेट आयोजित करण्यात आली. या भेटीत विद्यार्थ्यांनी गोंडकालीन इतिहास, स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वैभवाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या प्रसंगी तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, कढोली येथील प्रा. प्रदीप बोडने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, १२व्या शतकातील हत्तीगुंफा शिलालेखात ‘वज्रगड’ असा उल्लेख आढळतो. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे ‘वैरागड’ हे नाव प्रचलित झाले. हा किल्ला उत्कृष्ट वास्तुकलेचे उदाहरण असून त्याचे पुरातत्त्वीय संवर्धन अधिक प्रभावीपणे होणे गरजेचे आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. “ऐतिहासिक वास्तू आणि साहित्याचे जतन करणे ही केवळ गरज नसून आपले नैतिक कर्तव्य आहे,” असेही ते म्हणाले.

अभ्यास भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी किल्ल्यावरील तटबंदी, शिल्पकला, प्राचीन मंदिरे आणि परिसराच्या भौगोलिक रचनेचा सखोल अभ्यास केला. गडचिरोली जिल्ह्याचा हा वारसा केवळ पर्यटनापुरता मर्यादित नसून संशोधनासाठीही महत्त्वपूर्ण असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.

या उपक्रमासाठी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. विवेक जोशी, आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम, सहायक प्राध्यापक डॉ. प्रमोद जावरे तसेच पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker