आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दुष्काळग्रस्त महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक!
पाणी, रोजगार, आरोग्य व पोषणासाठी विशेष उपाययोजनांची मागणी; महिला जनसंवाद अभियानाला सुरुवात

गडचिरोली, प्रतिनिधी :-
दुष्काळग्रस्त भागातील महिलांच्या समस्या, पाणीटंचाई, रोजगाराचा अभाव, आरोग्य आणि पोषणाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने २५ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘दुष्काळ आणि महिलांचे प्रश्न – महिलांशी जनसंवाद!’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रभर महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्यांचे संकलन केले जात आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा तथा माजी खासदार डॉ. फौजिया खान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दुष्काळग्रस्त भागातील महिलांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी गडचिरोली येथे पत्रकार परिषद मधून केली आहे. दुष्काळामुळे महिलांवर पाणी आणण्यापासून कुटुंबाच्या उदरनिर्वाहापर्यंत अनेक जबाबदाऱ्यांचा अतिरिक्त भार पडत असून, त्याचा त्यांच्या आरोग्य, रोजगार, पोषण आणि मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करा
दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, विहिरींचे पुनर्भरण करावे, बोअरवेलची तपासणी करून नवीन पाणीस्रोत विकसित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक गावात महिलांच्या सहभागातून ग्रामस्तरीय पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे.
महिलांना आर्थिक मदत व रोजगाराच्या संधी द्या
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या महिलांना स्वतंत्र आर्थिक सहाय्य, निवृत्तिवेतन व उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. महिला बचत गटांना विशेष अनुदान देऊन त्यांचे कर्ज पुनर्गठित करावे, कर्जावरील व्याजाचा काही भाग शासनाने भरावा, तसेच रोजगार हमीच्या कामांवर महिलांना समान वेतन, वेळेवर मजुरी आणि पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय लहान मुलांना सांभाळणाऱ्या महिला मजुरांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघरांची व्यवस्था करावी, तसेच पाणी अडवणे, जलसंधारण, शेततळी, नाला खोलीकरण आणि वृक्षलागवड यांसारख्या कामांत स्थानिक महिलांना रोजगार द्यावा, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महिलांचे आरोग्य व पोषणाला प्राधान्य


