आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

भाडभीडीत वनहक्क व शेतीपट्ट्यांच्या प्रश्नांवर एल्गार!

२४ गावांतील शेतकरी बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

चामोर्शी, प्रतिनिधी :-

वनहक्क दावे आणि प्रलंबित शेतीपट्ट्यांच्या प्रश्नांबाबत शेतकरी व नागरिकांना आवश्यक माहिती मिळावी, तसेच त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो), नवी दिल्ली, जिल्हा गडचिरोली यांच्या पुढाकारातून २५ ऑक्टोबर २०२६ रोजी चामोर्शी तालुक्यातील मौजा भाडभीडी (ब) येथे माहिती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वनहक्क दावे, प्रलंबित शेतीपट्टे आणि संबंधित शासकीय प्रक्रियांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शासनदरबारी प्रलंबित असलेल्या दाव्यांची सद्यस्थिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जप्रक्रिया आणि पुढील कार्यवाही याबाबत शेतकरी व नागरिकांना माहिती देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

२४ गावांतील शेतकरी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

या कार्यशाळेसाठी जाणाळा, रेखेगाव, आमगाव, चक क्रमांक दोन, अनंतपूर, कुदरसी, जंगमपूर, बिलासपूर, हळदवाही, हळदवाही टोला, मंजेगाव, राजूर बुजुर्ग, राजूर खुर्द, लाभानतांडा, मक्केपल्ली, चापलवाडा, माडेमुधोली, रेगडी, पोतेपल्ली, माडेआमगाव, विकासपल्ली, घोट आणि पेटतळा यांसह परिसरातील गावांतील शेतकरी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वनजमिनीवरील हक्कांचे दावे आणि शेतीपट्ट्यांबाबत अनेक नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असल्याने, या कार्यशाळेच्या माध्यमातून संबंधितांना प्रक्रियेची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत पात्र दावेदारांना त्यांचे हक्क समजावून सांगणे आणि प्रलंबित प्रकरणांबाबत योग्य दिशेने पाठपुरावा करण्यासाठी मार्गदर्शन करणे, यावर भर देण्यात येणार आहे.

 संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन

या कार्यशाळेत परिसरातील शेतकरी, वनहक्क दावेदार आणि संबंधित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रम आयोजक विनोद किरमे, मास्टर श्रीकांत वैरागडे, सचिन देशमुख, गुरुदेव सातपुते, प्रकाश कोवासे तसेच संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker