आपला जिल्हाताज्या घडामोडी
गडचिरोलीत रोकडे ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे शानदार उद्घाटन !
१२४ वर्षांची परंपरा अन् पाच पिढ्यांचा विश्वास; सोने, हिरे आणि कुंदन दागिन्यांचे आकर्षक कलेक्शन उपलब्ध

गडचिरोली, प्रतिनिधी :-
दागिन्यांच्या क्षेत्रात १२४ वर्षांहून अधिक काळाची परंपरा आणि पाच पिढ्यांचा विश्वास जपणाऱ्या रोकडे ज्वेलर्सच्या भव्य व अत्याधुनिक शोरूमचे उद्घाटन गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे उत्साहात पार पडले. रोकडे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य भैयाजी रोकडे, वंदना रोकडे आणि प्रमुख अतिथी पुरुषोत्तम कावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.
चंद्रपूर-मूल मार्गावरील हॉटेल जिंजरजवळ सुरू करण्यात आलेले हे शोरूम ३,६०० चौरस फुटांहून अधिक क्षेत्रात विस्तारले आहे. आधुनिक सुविधा, दागिन्यांची विस्तृत श्रेणी आणि ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा ही या शोरूमची वैशिष्ट्ये आहेत.
एकाच छताखाली दागिन्यांची विस्तृत श्रेणी
नवीन शोरूममध्ये सोने, हिरे, पोलकी, कुंदन, वधूंसाठी खास दागिने आणि फाईन सिल्व्हर ज्वेलरीचे आकर्षक कलेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पारंपरिक भारतीय दागिन्यांपासून आधुनिक डिझाइन्सपर्यंत विविध पर्याय ग्राहकांना येथे मिळणार आहेत. विवाहसोहळे, सण-उत्सव, कौटुंबिक कार्यक्रम तसेच दैनंदिन वापरासाठी ग्राहकांच्या आवडीनुसार दागिने निवडण्याची सुविधा असेल. ग्राहकांच्या पसंतीनुसार खास डिझाइनचे दागिने तयार करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे.

तीन दिवस विशेष उद्घाटन ऑफर्स
गडचिरोलीकरांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष उद्घाटन ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. सोने व चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ५० टक्के, तर डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक खरेदीवर पुढील खरेदीसाठी मेकिंग चार्जेसमध्ये २५ टक्के सूट देणारे गिफ्ट व्हाउचर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या ऑफर्ससाठी शोरूममध्ये लागू असलेल्या नियम व अटी ग्राह्य राहतील.
याशिवाय, २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे मेकिंग चार्जेस ५ टक्क्यांपासून सुरू होत असून, १८ कॅरेट प्लेन गोल्ड ज्वेलरीचेही विविध पर्याय उपलब्ध आहेत.
पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकसेवेवर भर
ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी मोफत कॅरेटमीटर तपासणी, मोफत ज्योतिषीय मार्गदर्शन, ग्राहकांच्या पसंतीनुसार दागिने तयार करून देणे आणि जुन्या सोन्याच्या व्यवहारात पारदर्शकता राखणे यावर भर देण्यात येणार आहे. जुन्या सोन्याच्या वितळवण्याच्या प्रक्रियेचे रेकॉर्डिंग, कर चलनावर सविस्तर तपशील आणि सुरक्षित खरेदीचा अनुभव देण्याची सुविधा उपलब्ध असेल.
रोकडे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश भैयाजी रोकडे म्हणाले की, १२४ वर्षांहून अधिक काळ ग्राहकांनी दाखवलेला विश्वास हीच संस्थेची मोठी ताकद आहे. पारंपरिक मूल्यांसोबत आधुनिक डिझाइन्स, गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा यांचा समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न असून, गडचिरोलीतील नवीन शोरूम हा त्याचाच भाग आहे.



