ताज्या घडामोडीसामाजीक
गडचिरोलीत रोकडे ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे आज उद्घाटन !
अभिनेत्री शिल्पा शिंदे यांची उपस्थिती ठरणार सोहळ्याचे आकर्षण; १२४ वर्षांच्या परंपरेचा गडचिरोलीत विस्तार

गडचिरोली, प्रतिनिधी :-
सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या क्षेत्रात १२४ वर्षांहून अधिक काळाची परंपरा जपणाऱ्या रोकडे ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे उद्घाटन आज, गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ विजेती शिल्पा शिंदे उपस्थित राहणार असल्याने शहरवासीयांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे.
चंद्रपूर-मूल रोडवरील हे शोरूम ३,६०० चौरस फुटांहून अधिक क्षेत्रात उभारण्यात आले असून, ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. आधुनिक रचना, दागिन्यांचे विविध प्रकार आणि ग्राहकांच्या सोयी-सुरक्षेला प्राधान्य देणारी व्यवस्था ही या शोरूमची वैशिष्ट्ये असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
पाच पिढ्यांची परंपरा; आधुनिकतेची जोड
रोकडे ज्वेलर्सने आपल्या व्यवसायाचा विस्तार करताना पारंपरिक विश्वासासोबत आधुनिक दागिन्यांच्या बाजारपेठेतील बदलत्या गरजांवर भर दिला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे शोरूमचे संचालन केल्यानंतर आता गडचिरोलीत नवीन दालन सुरू करण्यात येत आहे. आगामी काळात यवतमाळ येथेही नवीन शोरूम सुरू करण्याची योजना कंपनीने आखली आहे.
या विस्ताराचे नेतृत्व प्रमोटर भैयाजी रोकडे, वंदना भैयाजी रोकडे तसेच व्यवस्थापकीय संचालक राजेश भैयाजी रोकडे आणि संचालक सारंग भैयाजी रोकडे, पारस राजेश रोकडे यांच्यासह रोकडे कुटुंबातील अन्य सदस्य करीत आहेत.
रितेश-जेनेलिया देशमुख ब्रँड अॅम्बेसेडर
रोकडे ज्वेलर्सने प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांना अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली ही जोडी ब्रँडच्या विश्वास, कौटुंबिक मूल्ये आणि आधुनिकतेच्या संकल्पनेशी जोडली गेली आहे.
सोन्यापासून हिऱ्यांपर्यंत दागिन्यांचे आकर्षक कलेक्शन
नवीन शोरूममध्ये २२ कॅरेट हॉलमार्क सोन्याचे दागिने, १८ कॅरेट सोन्याचे आधुनिक डिझाइन्स, हिऱ्यांचे दागिने, पोलकी आणि ब्रायडल ज्वेलरीचे विविध पर्याय उपलब्ध असणार आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवरील मेकिंग चार्जेस ५ टक्क्यांपासून सुरू होतात, तर डायमंड ज्वेलरीची सुरुवातीची किंमत १९,९९९ रुपयांपासून आहे.
ग्राहकांसाठी राशिरत्न खरेदी सुरक्षा योजना, जुन्या सोन्याच्या व्यवहारात पारदर्शकता, दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी कॅरेटमीटर आणि खरेदीच्या बिलात तपशीलवार माहिती देण्यावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय नियमित बचतीतून दागिने खरेदी करण्यासाठी सहा विविध खरेदी योजनाही सादर करण्यात आल्या आहेत. तीन दिवस विशेष उद्घाटन ऑफर्स
१५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ५० टक्के सूट, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर १०० टक्के सूट आणि पुढील खरेदीसाठी २५ टक्के मेकिंग चार्जेस सवलतीचे गिफ्ट व्हाउचर अशा ऑफर्स कंपनीने जाहीर केल्या आहेत. या ऑफर्सच्या अटी व शर्ती लागू राहतील.
गडचिरोलीच्या बाजारपेठेत नवी भर
गडचिरोली शहरातील वाढती बाजारपेठ आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन रोकडे ज्वेलर्सने येथे भव्य शोरूम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या दालनामुळे स्थानिक ग्राहकांना विविध प्रकारच्या दागिन्यांची खरेदी एकाच ठिकाणी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.e
“१२४ वर्षांहून अधिक काळ ग्राहकांचा विश्वास जपताना पारंपरिक मूल्यांना आधुनिकतेची जोड देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गडचिरोलीतील नवीन शोरूम हा त्याच प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. शहरातील नागरिकांनी या तीन दिवसीय उद्घाटन सोहळ्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन रोकडे ज्वेलर्सच्या व्यवस्थापनाने केले आहे.



