आपला जिल्हाताज्या घडामोडी

युवा चित्रकार तन्मय सोनटक्के यांच्या कलेचा नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळाकडून गौरव

चित्रप्रदर्शनातून कलागुणांचे दर्शन; युवकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा मंडळाचा उपक्रम

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शहरातील रामनगर येथील रहिवासी युवा चित्रकार व मूर्तिकार चि. तन्मय राजेश सोनटक्के यांच्या कलागुणांचा नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळ, चामोर्शी रोड, गडचिरोली यांच्या वतीने गौरव करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात तन्मय याचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्याने साकारलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.

तन्मय सोनटक्के याने आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून कलात्मक अभिव्यक्ती सादर केली. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना त्याच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळाली. युवा कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.

या सत्कारप्रसंगी नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश कात्रटवार, सुनील गभने, दिवाकर पेरकिवार, उमेश आखाडे, बंडू निरकुळवार, कृष्णा बुरडकर, सुरेश भांडेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

नवरात्र महोत्सवादरम्यान नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दररोज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कलागुण असलेल्या युवकांची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात येतो. युवकांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी संधी मिळावी आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजक प्रवीण मुक्तावरम यांनी सांगितले.

धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देत स्थानिक युवकांच्या कलागुणांचा गौरव करण्याच्या मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker