आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ईशान्य भैया भोयर यांचा लढा

कोटगल बॅरेज प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

अडपल्ली-गोगाव येथील कोटगल बॅरेज प्रकल्पासाठी भूसंपादित झालेल्या शेतजमिनींचे कमी मूल्यांकन झाल्याचा आरोप करत बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी अडपल्ली येथील ईशान्य भैया भोयर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन याबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

२०२३ पासून शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ईशान्य भोयर हे २०२३ पासून काम करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी ‘कोटगल बॅरेज प्रकल्प’ या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप सुरू करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एका व्यासपीठावर आणले. त्यातून शेतकऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करून त्यांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

योग्य मोबदल्यासाठी एकजुटीची गरज

भूसंपादन प्रक्रियेत मिळालेल्या मूल्यांकनाबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर योग्य मोबदल्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे बाधित शेतकरी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कोटगल बॅरेज प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळेपर्यंत हा लढा सातत्याने पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला असून, शेतकरी बांधवांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker