साहित्यकुंज झाडीबोली साहित्य मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेत मनोहर वाळिंबे यांनी सर्वोत्कृष्ट क्रमांक पटकावला आहे. मीनाक्षी शिलवंत (पुणे) आणि रेखा सोनारे (नागपूर) यांना उत्कृष्ट क्रमांकाने गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह अबुधाबी (यूएई) आणि मध्य प्रदेशातील साहित्यिकांनीही स्पर्धेत सहभाग नोंदविला.
११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरू झालेली ही स्पर्धा २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता संपन्न झाली. स्पर्धेत एकूण ३३ पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड करण्यात आली. या उपक्रमामुळे नवोदित आणि अनुभवी कवींना आपल्या काव्यप्रतिभेचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.
विविध गटांत साहित्यिकांनी मिळविले यश
विशेष प्रावीण्य गटात सुविद्या करमरकर (पुणे), धनाग्रज अर्थात मंदार आपटे (अबुधाबी, यूएई), किशोर गजानन नेवे (जळगाव), प्रदीप मोहिनीराज मुळे (पाथर्डी, अहिल्यानगर), शोभा प्रकाश कोठावदे (नवी मुंबई) आणि सुधीर मोहिनीराज कुलकर्णी (वाई, सातारा) यांनी स्थान मिळविले.
प्रथम क्रमांकाचा पुरस्कार रसिका आनंद शाळिग्राम (काव्यरसिका), पुणे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांकासाठी डॉ. भोजराज लांजेवार (नागपूर) आणि अरुण बिजवे (यवतमाळ) यांची निवड झाली. तृतीय क्रमांक विजयकुमार मेश्राम (गोंदिया), विरेंद्र प्रमोद पिलणकर (रत्नागिरी) आणि आरती मुकुंद महेकर यांनी मिळविला.
लक्षवेधी पुरस्कारांच्या गटात जिजा वाघ (उज्जैनपुरीकर, जालना), प्रा. डॉ. नंदा संतोष हरम (औंध, पुणे), अनिल चांडक (संगमनेर), वीणा पाटील (कोल्हापूर), वैशाली संजय पहुरकर (विक्रोळी, मध्य मुंबई), डॉ. महेशकुमार बालपांडे (तुमसर, भंडारा), उषा सत्येंद्र वराडे (पुणे) आणि मनिषा एन. खालकर (कोपरगाव, अहिल्यानगर) यांनी यश संपादन केले.
उत्तेजनार्थ पुरस्कारांसाठी राजेंद्र यादवराव सोनटक्के (गडचिरोली), इंदुमती वाटकर (चंद्रपूर), लक्ष्मण नाईक पाथरीकर (परभणी), प्रतिभा धडफळे (भोपाळ, मध्य प्रदेश), मंगेश गंगाधर सावंत (अंबाजोगाई, बीड), प्रभाकर भामरे (धुळे), प्रा. डॉ. योगेश्वर श्रीपाल कीर्तिकर ‘अनुसुमन’ (सांगली), जयंती मनोहर बनकर (चंद्रपूर), अनिता धुर्वे (नागपूर) आणि ॲड. सुलभा गोगरकर (अमरावती) यांची निवड करण्यात आली.
मान्यवरांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेचे परीक्षण कविराज शब्दसम्राट विजय अर्थात विजय यशवंत सातपुते (पुणे) यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, संचालिका किरणताई महादेव चौधरी आणि गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर यांनी पुढाकार घेतला.
नवोदित कवींना लेखनासाठी प्रेरित करणे, साहित्यिकांना प्रोत्साहन देणे आणि मराठी साहित्याच्या प्रसारासोबत झाडीबोली साहित्याचे संवर्धन करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. विविध भागांतील साहित्यिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे या उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे साहित्यप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.