ताज्या घडामोडीसामाजीक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी सप्ताहाला प्रारंभ

गडचिरोली, प्रतिनिधी :-

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, मुख्य शाखा गडचिरोलीच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २७ ऑक्टोबर ते सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या सप्ताहात सामुदायिक ध्यान, प्रार्थना, ग्रामगीता वाचन, भजन, कीर्तन, प्रवचन, परिसंवाद आणि सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करणे, मानवतेची शिकवण समाजापर्यंत पोहोचविणे आणि सामाजिक एकात्मतेची भावना दृढ करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. ‘सर्व संत स्मृती, मानवता दिन सप्ताह’ या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध विषयांवर परिसंवाद व प्रबोधन

सप्ताहादरम्यान राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी पूजन व प्रतिमेची प्रतिष्ठापना, ग्रामगीता वाचन, सामुदायिक प्रार्थना, विचारप्रवर्तन आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय ‘शास्त्रशुद्ध विचारधारा’, ‘पालक मेळावा’, ‘पालकत्व-बालसंस्कार’, ‘व्यसनमुक्ती’ तसेच राष्ट्रसंतांच्या विचारांवर आधारित विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमांत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. गुरुदेव विद्यालय, गडचिरोली येथे बालसंस्कार स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

दिनांकवार कार्यक्रम

मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६

– पहाटे ५.३० वाजता – राष्ट्रसंतांच्या समाधीचे पूजन व प्रतिमेची प्रतिष्ठापना.

– सकाळी ६.३० ते ७.३० – रामधून.

– सकाळी ७.३० ते ८.३० – ग्रामगीता वाचन.

– सायंकाळी ६ ते ७ – सामुदायिक प्रार्थना व विचारप्रकटन.

बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६

– पहाटे ५.३० – सामुदायिक ध्यान व चिंतन.

– सकाळी ६.३० ते ७.३० – रामधून.

– सकाळी ७.३० ते ८ – ग्रामगीता वाचन.

– सकाळी ८ वाजता – ध्वजारोहण.

– सकाळी ९ ते १०.३० – ‘राष्ट्रसंत विचारधारा’ विषयावर परिसंवाद.

– सायंकाळी ६ ते ७ – सामुदायिक प्रार्थना व विचारप्रकटन.

– रात्री ७ ते ८ – भजन.

गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६

– पहाटे ५.३० – सामुदायिक ध्यान व चिंतन.

– सकाळी ६.३० ते ७.३० – रामधून.

– सकाळी ७.३० ते ८.३० – ग्रामगीता वाचन.

– दुपारी ४ ते ५.३० – पालक मेळावा व ‘पालकत्व-बालसंस्कार’ परिसंवाद.

– सायंकाळी ६ ते ७ – सामुदायिक प्रार्थना व विचारप्रकटन.

– रात्री ७ ते ८ – भजन.

शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६

– पहाटे ५.३० – सामुदायिक ध्यान व चिंतन.

– सकाळी ६.३० ते ७.३० – रामधून.

– सकाळी ७.३० ते ८.३० – ग्रामगीता वाचन.

– दुपारी ३.३० ते ४.४८ – ‘सर्वधर्मीय प्रार्थना’.

– सायंकाळी ४.४८ वाजता – मौन श्रद्धांजली.

शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६

– पहाटे ५.३० – सामुदायिक ध्यान व चिंतन.

– सकाळी ६.३० ते ७.३० – रामधून.

– सकाळी ७.३० ते ८.३० – ग्रामगीता वाचन.

– सायंकाळी ६ ते ७ – सामुदायिक प्रार्थना व विचारप्रकटन.

– सायंकाळी ७ ते ९.३० – बालमंडळ भजन स्पर्धा (वयोगट ६ ते १४ वर्षे).

रविवार, १ नोव्हेंबर २०२६

– पहाटे ५.३० – सामुदायिक ध्यान व चिंतन.

– सकाळी ६.३० ते ७.३० – रामधून.

– सकाळी ७.३० ते ८.३० – ग्रामगीता वाचन.

– दुपारी ३ ते ५ – ‘झाडीबोली कवी संमेलन’; विषय – ‘व्यसनमुक्ती’.

– सायंकाळी ६ ते ७ – सामुदायिक प्रार्थना व विचारप्रकटन.

– रात्री ७ ते ८ – ‘स्व. डॉ. शिवनाजीराव कुंभारे साहेब – लाभलेल्या सहवासाचे क्षण आणि विचार’ या विषयावर परिसंवाद.

सोमवार, २ नोव्हेंबर २०२६

– पहाटे ५.३० – सामुदायिक ध्यान व चिंतन.

– सकाळी ६.३० ते ८.३० – रामधून व विविध रचनात्मक कार्यक्रम.

– सकाळी ८.३० ते दुपारी १२ – विविध रचनात्मक कार्यक्रम.

– दुपारी १२ ते ३ – ‘गोपालकाल्याचा कीर्तन’ कार्यक्रम.

– दुपारी ३ ते ५ – समारोपीय कार्यक्रम.

– सायंकाळी ५.३० – सामुदायिक प्रार्थना.

– सायंकाळी ६ – महाप्रसाद.

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि मानवतेचा संदेश समाजात रुजविण्यासाठी नागरिकांनी या सप्ताहातील विविध कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, मुख्य शाखा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.

२ नोव्हेंबरला सप्ताहाची सांगता

सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता वाचन, व्यसनमुक्तीविषयक प्रबोधन आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांचे आचरण करून समाजात सेवा, सद्भावना, बंधुता आणि मानवतेची मूल्ये रुजविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या सप्ताहात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रसंतांच्या विचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, मुख्य शाखा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker