मुंबई, प्रतिनिधी :-
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ९ फेब्रुवारीला पार पडणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने निवडणूक कार्यक्रमात हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेतील मतदान टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. उमेदवारी अर्ज, छाननी व अंतिम उमेदवार यादीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता मतदान, मतमोजणी व राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
संबंधित जिल्हाधिकारी ३१ जानेवारी रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून,जाहीर प्रचाराची सांगता ५ फेब्रुवारी रात्री १० वाजता होणार आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button