आपला जिल्हाराजकीय

गीता हिंगे यांनी भाजपला दिली सोडचिठ्ठी

25 वर्षांची निष्ठा संपली

गडचिरोली, प्रतिनिधी :-

भारतीय जनता पक्षामध्ये दीर्घकाळ निष्ठेने काम केलेल्या माजी महिला अध्यक्ष तथा महामंत्री गीता हिंगे यांनी अखेर आज भाजपचा राजीनामा जाहीर केला. नगराध्यक्ष पदासाठी तिकीट नाकारण्यात आल्यापासूनच त्यांच्या नाराजीची मालिका सुरू झाली होती.

तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी सलग अनेक दिवस सोशल मीडियावर पोस्ट करून पक्षातील स्वपक्षीय नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यामुळे त्यांच्या असंतोषाचे संकेत आधीच स्पष्ट झाले होते.

स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षा बाहेरून आणलेल्या चेहऱ्यांना प्राधान्य, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्याय यामुळे गीता हिंगे यांनी शेवटी भाजपला रामराम केला.

त्यांच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker