ताज्या घडामोडीदेश विदेश
इराणचे ‘६० हजार कोटी’ आणि भारत-इराण आर्थिक संबंधांची पार्श्वभूमी

नवी दिल्ली,विशेष प्रतिनिधी :-
इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते दिवंगत आयतोल्ला खामेनेई यांनी एका भाषणात उल्लेख केला होता की, “भारताच्या बँकांमध्ये आमचे सुमारे ६० हजार कोटी रुपये जमा आहेत. ते भारताच्या उपयोगात येत असतील तर आम्हाला आनंद आहे. भारत आमचा जवळचा मित्र आहे.” या वक्तव्यामुळे भारत-इराण आर्थिक संबंधांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. हा कालावधी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातील होता.
नेमके प्रकरण काय ?
भारत हा इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करणारा देश होता. मात्र इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे (अमेरिकन निर्बंध) डॉलरमध्ये थेट व्यवहार करणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन्ही देशांनी पर्यायी आर्थिक यंत्रणा उभी केली.
या व्यवस्थेनुसार भारताने इराणकडून आयात केलेल्या तेलाचे पैसे रुपयांत अदा केले. ही रक्कम भारतीय बँकांमधील विशेष खात्यांत जमा केली जात होती. त्यासाठी प्रामुख्याने UCO Bank आणि IDBI Bank यांचा वापर करण्यात आला. या खात्यांमध्ये इराणच्या नावावर हजारो कोटी रुपये साठले.
‘६० हजार कोटी’ म्हणजे काय ?
सदर रक्कम भारताने रोखून ठेवलेली नव्हती, तर ती इराणच्या मालकीची होती आणि भारतीय बँकांमध्ये त्यांच्या नावावर जमा होती. अंदाजे ही रक्कम ५० ते ६० हजार कोटी रुपयांच्या दरम्यान होती. त्या काळात संबंधित बँकांवर आर्थिक ताण असल्याची चर्चा होती; मात्र या ठेवींमुळे त्यांच्या तरलतेला काही प्रमाणात आधार मिळाल्याचे आर्थिक विश्लेषकांचे मत होते.
इराण हे पैसे कसे वापरत होते ?
डॉलर व्यवहारांवर निर्बंध असल्यामुळे इराण या रुपयांचा उपयोग भारतातून वस्तू खरेदी करण्यासाठी करत होता. त्यात प्रामुख्याने :-
औषधे, तांदूळ, चहा, अन्नधान्य, औद्योगिक साहित्य



