वरोरा, प्रतिनिधी :-
वरोरा येथील साहित्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व, राज्य पुरस्कारप्राप्त माजी मुख्याध्यापक तथा झाडीबोली चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आचार्य ना. गो. थुटे (नागो गोविंदराव थुटे) यांचे सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी पहाटे १२.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वरोरा तसेच संपूर्ण झाडीबोली साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
आचार्य थुटे हे झाडीबोली साहित्य मंडळ आणि मराठी बोली साहितत्य संघ यांच्या केंद्रीय समितीचे माजी सदस्य होते. तसेच ८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. झाडीबोली भाषेच्या जतन व संवर्धनासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.
शिक्षण क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले, तर साहित्य क्षेत्रात लेखन, मार्गदर्शन आणि संघटनात्मक कार्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू, संयमी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता वरोरा येथील “अविष्कार”, वणी नाका येथून अंत्ययात्रा निघून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
झाडीबोली साहित्य मंडळ, मराठी बोली साहित्य संघ तसेच सर्व शाखा, पदाधिकारी व सदस्यांनी आचार्य थुटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Back to top button