गडचिरोली, प्रतिनिधी :-
गोगाव येथील युवाशक्ती नाट्यकला मंडळातर्फे नुकत्याच आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्यकर्मी सुनीलभाऊ चडगुलवार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. झाडीपट्टीतील नाट्यपरंपरेला दिलेल्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान मंडळाचे कोषाध्यक्ष वसंत चापले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, झाडीपट्टीतील कलावंतांचा हा सन्मान अत्यंत मोलाचा असून अशा प्रकारे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव होत राहणे आवश्यक आहे.
गोगावचे मूळ रहिवासी असलेले सुनील चडगुलवार हे पेशाने सरकारी सेवेत होते. त्यांनी विविध तालुक्यांत नायब तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली. नोकरीच्या व्यस्ततेतही त्यांनी नाट्यकलेशी असलेले नाते कायम जपले. १९८० ते २०१५ या कालावधीत त्यांनी सुमारे ५५० हून अधिक नाटके, एकांकिका, एकपात्री प्रयोग तसेच टेलिफिल्ममध्ये प्रभावी अभिनय साकारला. कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका साकारत त्यांनी नाट्यरसिकांची मने जिंकली. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना कधी हसवणारे तर कधी भावूक करणारे अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे.
गडचिरोलीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गोगाव येथील युवाशक्ती नाट्यकला मंडळाने त्यांच्या नाट्यसेवेची दखल घेत गावाच्या वतीने त्यांचा सन्मान केला.
या कार्यक्रमाला मोहनभाऊ ठाकरे, अविनाश वरगंटीवार, प्रविण मुक्तावारम, माजी सरपंच कालदाजी चापले, शांताबाई चापले, शालिनीताई रायपुरे, सरपंच राजू उंदीरवाडे, उपसरपंच निलेश दाकोटे, राऊत साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून मराठी लावणीचे सादरीकरण करण्यात आले, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia