आपला जिल्हासामाजीक

50 शालेय विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

गडचिरोली,प्रतिनिधी :-

         गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व माऊली सेवा मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभाग सिरोंचा अंतर्गत उपपोस्टे रेगुंठा येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या भव्य जनजागरण मेळाव्यामध्ये रेगुंठा  परिसरातील 500 ते 600 नागरिकांनी मोठ¬ा प्रमाणात सहभाग नोंदविला.

           सदर भव्य जनजागरण मेळाव्यांमध्ये गडचिरोली पोलीस दलातर्फे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ घेता यावा म्हणुन, पोलीस दादालोरा खिडकी सुरू करण्यात आली.

या खिडकीच्या माध्यमातुन उपपोस्टे रेगुंठा हद्दीतील गोरगरीब आणि होतकरु शाळकरी मुलींसाठी 50 सायकलचे वाटप करण्यात आले.  तसेच उपस्थित नागरिकांना 50 ब्लॅकेंट, 100 साड¬ा, 50 कुर्ते, 150 महीलांना इतर साहीत्य व शाळकरी मुलांसाठी पेन, पेन्सील, वही तसेच इतर शालेय उपयोगी साहीत्यांचे वाटप करण्यात आले.  सदर मेळाव्यात  पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थित नागरीकांना संबोधित करतांना सागीतले की, पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून हद्दीतील सर्व जनतेच्या व विद्याथ्र्यांच्या कोणत्याही प्रकारची कामे, अडचणी पोलीस दलातर्फे सोडविल्या जातील.  तसेच पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून कोणकोणत्या योजनांचा लाभ नागरिक घेऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन केले.  पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून आजपावेतो 2,78,471 नागरिकाना आले पर्यत विविध योजनांचा लाभ पोहचविण्यात आला आहे.

          सदर मेळाव्यास मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान), अनुज तारे. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, (अहेरी)  यतिश देशमुख तसेच  सुहास खरे, अध्यक्ष, माऊली सेवा मंडळ, नागपूर हे उपस्थित होते.

          सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा  सुहास शिंदे, उपपोस्टे रेगुंठाचे प्रभारी अधिकारी  विजय सानप, पोउपनि. सागर पाटील, पोउपनि. निजाम सय्यद, एसआरपीएफचे ग्रुप जालनाचे पोउपनि.  बच्चेवार व पोउपनि.  शेंडे, उपपोस्टे रेगुंठा येथील सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.