गडचिरोली, प्रतिनिधी :-
“स्त्री ही सृष्टीची शक्ती असून समाजातील विविध नात्यांमध्ये तिचे योगदान अमूल्य आहे. आजच्या काळात महिलांनी शिक्षण, प्रशासन, विज्ञान, क्रीडा आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे,” असे प्रतिपादन योगिता पिपरे यांनी केले.
भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महिला व मुलींचा गौरव, महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयातील सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे होत्या. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी भारताच्या इतिहासातील महान महिलांचे कार्य अधोरेखित करत जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांसारख्या महिलांनी आपल्या कार्यातून देशाचे नाव जगभर पोहोचविले असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रातही महिलांनी मोठी झेप घेतली असून धावपटू पी. टी. उषा तसेच अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी देशाचा गौरव वाढविला असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या पिढीतील मुलींनी या प्रेरणादायी महिलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गोंडवाना सैनिक विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी महिला सुरक्षा, क्रीडा क्षेत्रातील संधी आणि आत्मविश्वासाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित खेळाडूंमध्ये धनुर्विद्या क्षेत्रातील प्रीती लता पुजेरी, अनु नैताम, कौमुदी श्रीरामवार, कराटेपटू स्वरा नेरकर, आरोही चव्हाण, सॉफ्टबॉल खेळाडू संग्रामे तसेच मार्शल आर्ट्स क्षेत्रातील ऐन्जल देवकुले यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, डॉ. चंदा कोडवते, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली नरोटे, महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित, पुणे येथील संचालक प्रमोद पिपरे तसेच प्रकाश गेडाम आणि रमेश भुरसे यांची उपस्थिती लाभली.
तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा महामंत्री शालिनीताई पोहनेकर, गडचिरोली शहर महिला आघाडी अध्यक्ष व महिला-बालकल्याण समिती सभापती सीमाताई कन्नमवार, उपसभापती शिल्पा हेमके, प्रतिभाताई चौधरी, कविताताई उरकुडे, धानोरा तालुका अध्यक्ष भूमाला परचाके, गडचिरोली तालुका अध्यक्ष किरण चचाने, अनिता राय (चामोर्शी), रुमनबाई ठकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चनाताई बोरकुटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शालिनीताई पोहनेकर यांनी मानले. महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia