सामाजीक

आज गडचिरोलीत कारगील विजय दिन साजरा होणार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शहरातील कारगील चौक येथे 26  जुलै ला कारगील विजय दिन साजरा करण्यात येणार आहे.   

चोरांनी स्मारकला सुद्धा सोडले नाही.                             

या स्मारकवर अंत्याधुनिक तंत्रची विद्युत रोषणाई ची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील अंदाजे  2000/- किमतीचे 7 विद्युत बल्बवर चोरांनी जवळपास रुपये 14000/- चा डल्ला मारला आहे. या मुळे या स्मारकावर कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी अध्यक्ष उदय धकाते यांनी केली असून नगर परिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी मंजुरी दिली आहे.तसेच 26 जुलै ला संध्याकाळी स्मारक वर आकर्षक रोषनाई शहर वासियांना बघायला मिळणार आहे. मागील वीस वर्षा पासून या स्मारक साठी अथक प्रयत्न करणारे कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ,गडचिरोलीचे अध्यक्ष उदय धकाते यांनी हि माहिती दिली आहे.

          

स्थानिक कारगील चौक गडचिरोली येथे कारगील युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृती निमित्य भव्य  कारगील स्मारक साकारण्यात आले आहे.सदर स्मारकचे काम 95% पूर्ण झाले असून जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती असल्याने स्मारकचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे.नगर परिषद गडचिरोलीतर्फे  वैशिष्ठ्यपूर्ण योजना अंतर्गत सदर कारगील  स्मारक साकारण्यात आले.                                 

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली च्या वतीने 26 जुलै ला सकाळी 10 वाजता भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.संध्याकाळी स्मारकावरील आकर्षक रोषणाई पाहायला मिळणार आहे. मागील 21 वर्षापासून येथे नित्यानेमाने कारगील विजय दिवस साजरा अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात होत आहे.                       

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker