ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र शासनचा महागाई भत्ता ५८% करण्याचा निर्णय

गडचिरोली, प्रतिनिधी:- 

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनने महागाई भत्ता (DA) ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यास मंजुरी दिली आहे. हा निर्णय दि. १ जुलै २०२५ पासून लागू राहणार असून, प्रत्यक्ष वाढीव रक्कम फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने देण्यात येणार आहे.

दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी वित्त विभागाने शासन निर्णय (क्र. मभवा-1325/प्र.क्र.19/सेवा-9) जारी केला. हा निर्णय केंद्र सरकारच्या दि. ६ ऑक्टोबर २०२५ च्या कार्यालयीन ज्ञापनाच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे.

थकबाकी मार्चमध्ये :-

जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी मार्च २०२६ मध्ये रोखीने अदा करण्यात येणार आहे. उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

७ व्या वेतन आयोगानुसार लाभ :-

हा वाढीव महागाई भत्ता ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूलभूत वेतनावर लागू राहील. महागाई भत्त्याच्या देयकासंदर्भातील विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती यापुढेही कायम राहणार आहेत.

खर्चाची तरतूद :-

महागाई भत्त्यावरील अतिरिक्त खर्च संबंधित लेखाशीर्षाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही हीच कार्यपद्धती लागू राहील.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दिलासा मिळणार आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker