सामाजीक

गडचिरोली तालुका विज्ञान प्रदर्शनी ची सांगता

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

पंचायत समिती गडचिरोली च्या वतीने वसंत विद्यालय गडचिरोली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी ची सांगता करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनापासून विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याच्या उद्देशाने दि.9,10,11फेब्रुवारी 2023 ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. 

सर्वप्रथम डॉ. सी. वी. रमण व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या महापुरुषाला माल्यार्पण करून मान्यवराच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.या समरोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पोरेड्डीवर हे होते.

 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संध्याताई पोरेड्डीवार, रमेश उचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक )जि.प.नारायण परांडे,बालविकास अधिकारी,डी.डी. सोनटक्के, सुनील पोरेड्डीवार, यू.एन.राऊत, श्री अविनाश वऱ्हाडे केंद्रप्रमुख, वसुधा रायपुरे, संचालन कु. बिसेन, आभार श्रीमती खोब्रागडे शिक्षण विस्तार अधिकारी,तसेच सर्व केंद्रप्रमुख इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र काटेंगे यांनी केले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker