सामाजीक

विद्यार्थ्यांनी कला कौशल्यात पुढे यावे – प्रचिंत पोरेड्डीवार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम त्यांना उत्साही आणि त्यांच्या वर्तमान आणि भविष्यातील जीवनासाठी मार्गदर्शक बनवतो. सांस्कृतिक कार्यक्रम हे विद्यार्थी जीवनात अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत, विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक व्यासपीठाचा लाभ घ्यावा असे विचार इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली व इंदिरा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रचीत सावकार परेड्डीवार यांनी व्यक्त केले.

          राष्ट्रपिता महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि माता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रथम दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

          स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकता सामाजिक शिक्षण संस्था गडचिरोलीचे संस्थापक प्रकाश आर.अर्जुनवार होते. जागतिक शांतता दूत प्रकाश आर. अर्जुनवार यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच कला कौशल्यांमध्ये पारंगत होण्याचे आवाहन केले. कैलाशचंद्र अर्जुनवार, मुख्याध्यापिका नलिनी मेश्राम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सुषमा बुरले या वेळी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी फॅशन शो आणि अनेक कार्यक्रम सादर करून आजचा दिवस मोठ्या दिमाखात पार पडला.

          संचालन प्राध्यापक विशाल भांडेकर व प्राध्यापिका वृषाली मडावी यांनी केले. प्रास्ताविक प्रा.सुषमा बुरले यांनी केले तर आभार प्रा.लुतेश जवंजारकर यांनी मानले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.