चंद्रपूर, प्रतिनिधी :-
गडचिरोलीहून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गोंडपिंपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत ४६ जनावरांची सुटका केली. या कारवाईत सुमारे ५०.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वढोली येथे नाकाबंदी करून पाच पिकअप वाहने अडविण्यात आली. यावेळी दोन चालक – मोहसीन आयूब खान (४०) व मोहम्मद मंजूर अली (४२), दोघेही तेलंगणातील – यांना ताब्यात घेण्यात आले, तर इतर चार चालक फरार झाले.
पोलिसांनी ४६ गोवंशीय जनावरे (किंमत अंदाजे ९.२० लाख रुपये) तसेच पाच पिकअप वाहने (किंमत अंदाजे ४१ लाख रुपये) जप्त केली. एकूण मुद्देमालाची किंमत ५०.२० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या पथकाने केली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Back to top button