ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्षांसोबत गडचिरोली पदाधिकाऱ्यांची संघटन बळकटीवर चर्चा

सोशल मीडिया प्रमुख सुरज गुंडमवार यांची विशेष भेट

मुंबई, प्रतिनिधी :-

मुंबई येथे पार पडलेल्या “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान” बैठकीदरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्याचे सोशल मीडिया प्रमुख सुरज गुंडमवार व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी विशेष भेट घेतली.

या भेटीत गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षण महाअभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष रमेशजी बरसागडे यांनी जिल्ह्यातील संघटन रचना, बूथस्तरावरील स्थिती आणि आगामी प्रशिक्षण नियोजनाची माहिती प्रदेशाध्यक्षांना दिली. दुर्गम व भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यात प्रत्येक बूथपर्यंत प्रशिक्षण पोहोचवून कार्यकर्त्यांना वैचारिक व संघटनात्मकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सुरज गुंडमवार यांनी मंडल व बूथ पातळीवर समित्या स्थापन करून टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण पूर्ण केले जाईल, असा कृती आराखडा मांडला. प्रत्येक कार्यकर्ता वैचारिकदृष्ट्या सक्षम व संघटनात्मकदृष्ट्या सजग व्हावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या कार्याचे कौतुक करत “मजबूत बूथ म्हणजे मजबूत संघटन” या विचारावर भर दिला आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीच्या सूचना केल्या.

या वेळी जिल्हाध्यक्ष रमेशजी बरसागडे, सह-संयोजक अनिल पोहनकर, अनिल तिडके तसेच महिला मोर्चाच्या सीमा कन्नमवार उपस्थित होत्या. सर्व पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षण महाअभियान यशस्वी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

मुंबईतील या बैठकीनंतर गडचिरोली जिल्ह्यात “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान” अधिक जोमाने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker