आपला जिल्हाताज्या घडामोडी

हालेवारा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात

शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन; नव्याने दाखल शिक्षकांचा सत्कार

एटापल्ली, तालुका प्रतिनिधी :-

एटापल्ली तालुक्यातील कसन्सूर केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन हालेवारा येथे उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हालेवारा येथील उपसरपंच संध्याताई कन्नलवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बीआरसी एटापल्लीचे सुरज उत्तरवार, तसेच नागमोते सर, प्रवीण चन्नावार सर आणि सचिन वाकडे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीमाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पवित्र पोर्टलमार्फत कसन्सूर केंद्रात नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांचेही मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला

शिक्षण परिषदेत नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व मार्गदर्शन या विषयावर सचिन वाकडे यांनी मार्गदर्शन केले. नरोटे यांनी मागील शिक्षण परिषदेचा इतिवृत्तांत सादर केला. निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी याबाबत सुरज उत्तरवार व भाग्यवान शेंडे यांनी सविस्तर माहिती दिली.

लांडे सर यांनी पीजीआय व यू-डायस प्लस, सोमनाथ उतापते यांनी शैक्षणिक क्षेत्रभेट नियोजन व त्रैमासिक पालक सभा, तर मोहुर्ले सर यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठीच्या विविध पद्धतींवर मार्गदर्शन केले. बाबुराव गोटे यांनी एसएमसी पुनर्गठन, निखिल बर्डे यांनी शैक्षणिक साहित्य व्यवस्थापन व वापर, तर मुकेश धोंगडे यांनी समग्र प्रगती पत्रक (HPC) यावर सादरीकरण केले.

याशिवाय रंजीत उंदीरवाडे यांनी डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, तर श्रीकृष्ण उरकुडे यांनी इयत्ता तिसरी-चौथी कार्यशिक्षण व सहावीतील व्यावसायिक शिक्षणाच्या अंमलबजावणीचे महत्त्व स्पष्ट केले.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी कसन्सूर केंद्रातील शिक्षक व मुख्याध्यापक सातत्याने प्रयत्नशील आहेत. केंद्राची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा कायम ठेवत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, तसेच केंद्राचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन सुरज उत्तरवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हालेवारा शाळेचे मुख्याध्यापक बडा सर, कु. लक्ष्मी किरसाण मॅडम, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन रानू वाचामी यांनी केले, तर आभार सचिन वाकडे यांनी मानले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker