सामाजीक

फूड विक्रेत्यांसाठी FoSTaC विशेष प्रशिक्षण

150 हून अधिक व्यावसायिकांचा सहभाग

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील रस्त्यावर तसेच विविध दुकानांमध्ये अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली आणि FoSTaC संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

हे प्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पार पडले. संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात सर्वांनी संविधानाची शपथ घेऊन करण्यात आली. शहरातील 150 हून अधिक फूड विक्रेत्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला.

 खेळीमेळीच्या वातावरणातील उपयुक्त प्रशिक्षण

FoSTaC चे अधिकृत प्रशिक्षक गुरुनाथ सावंत यांनी फूड सेफ्टीचे नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि आवश्यक खबरदारी सोप्या व स्थानिकांना समजेल अशा भाषेत प्रभावीपणे समजावून सांगितली. प्रशिक्षण पूर्णपणे संवादात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात घेतल्याने विक्रेत्यांनी माहिती सहज आत्मसात केली.

 मार्गदर्शन व प्रास्ताविक

अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अन्न सुरक्षा कायदा, नियम व उल्लंघन झाल्यास होणारी दंडात्मक कारवाई याबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी जितेंद्र कुंजम यांनी व्यवसायात पाळावयाच्या मूलभूत अटींबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी हॉटेल असोसिएशन गडचिरोलीचे अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे यांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून ग्राहकांच्या आरोग्याची जबाबदारी जपावी, असे आवाहन केले.

 प्रमाणपत्र आणि सुरक्षा किटचे वितरण

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विक्रेत्यांना FSSAI–FoSTaC Food Safety Training and Certificate of Competence प्रदान करण्यात आले.

यासोबतच विक्रेत्यांना खालील साहित्य असलेली FoSTaC सुरक्षा किट देण्यात आली :-

2 एप्रॉन

3 छोटे नॅपकिन

1 टोपी / 1 पाकीट हेअर कॅप

“I Serve Safe Food – I Follow the Golden Rules” पोस्टर

उपस्थितांनी 12 अन्न सुरक्षा गोल्डन रुल्सची शपथ देखील घेतली.

सदर कार्यक्रम सह आयुक्त  कृष्णा जयपूरकर (नागपूर विभाग) व सहायक आयुक्त  नीलेश ताथोड (गडचिरोली) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाचे आभार मारोती गोडे (नमुना सहाय्यक) यांनी व्यक्त केले. मदन चावरे व इतर सहकाऱ्यांचेही सहकार्य लाभले.

SHARE

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.