गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली येथील प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या व राजकीय नेत्या गीता सुशील हिंगे यांचे काल रात्री झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. ही बातमी समजताच गडचिरोली शहरात शोककळा पसरली आहे.
मागील आठ वर्षांपासून ‘आधार विश्व फाउंडेशन’च्या अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या हिंगे यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्या भाजपच्या माजी जिल्हा अध्यक्ष व महामंत्री म्हणूनही सक्रिय होत्या. गडचिरोली नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असतानाच भाजपने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाला रामराम करून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. पक्ष प्रवेशानंतर त्यांची महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
काल रात्री सुमारे ११ वाजता त्या नागपूरहून गडचिरोलीकडे परत येत असताना पाचगावजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नेण्यात आले परंतु रात्री १२.०५ वाजता त्यांचे निधन झाले. या अपघाती निधनाने गडचिरोलीकरांना मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्यावर आज दुपारी गडचिरोली येथे अंत्यविधी होणार असल्याची माहिती त्यांच्या पती सुशील हिंगे यांनी महाभारत न्यूजला दिली.
Post Views: 56,366
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.