क्राईम

मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे ९ गुन्हे उघड

५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे एकूण ९ गुन्हे उघडकीस आणले असून या प्रकरणात मुख्य आरोपींसह टोळीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहेरी, ताडगाव, पेरमिली, राजाराम (खां.), येमली बुर्गी व गोंडपिपरी (चंद्रपूर) परिसरातील गुन्ह्यांचा पर्दाफाश केला.

या कारवाईत चोरीसाठी वापरलेले पिकअप वाहन, रोख रक्कम व इतर साहित्य असा सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

थोडक्यात सारांश: • मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे ९ गुन्हे उघड

• टोळी अटकेत

• ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

• जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांशी संबंधित गुन्हे उघडकीस

पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १५ दिवस पाळत ठेवून गोविंद खंडेलवार (रा. आलापल्ली), उमेश इंगोले (रा. नेहरुनगर) यांच्यासह अन्य आरोपींना अटक केली. चोरी केलेल्या बॅटऱ्या अहेरी व कागजनगर येथे विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणात गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील ८ गुन्हे तसेच गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) येथील १ वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून पुढील तपास सुरू आहे.

SHARE

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.